Share

‘मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी बोलण्याची गरज नाही’, सोनिया गांधींचा स्वपक्षीय नेत्यांना टोला

Published On: 

नवी-दिल्ली : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांच्यासह पक्षाचे ५२ वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन अध्यक्षपदासाठी चर्चा होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी भाष्य केले तसेच सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुकांबाबतही त्यांनी चर्चा केली.

यावेळी स्वपक्षीय नेत्यांना सुनावत त्या म्हणाल्या की,’मी पक्षाच्या नेत्यांशी खुल्या मनाने बोलते पण माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही. तसेच प्रत्येक पक्षाच्या सदस्याला काँग्रेसचे पुनरुज्जीवन हवे आहे, पण यासाठी एकता आणि पक्षाचे हित सर्वोपरी ठेवणे आवश्यक आहे. तसेच मला माहित आहे की मी अंतरिम अध्यक्ष आहे, आधीच निवडणुका घ्यायच्या होत्या पण करोनामुळे निवडणुका घेऊ शकल्या नाहीत. आता पक्ष संघटनेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’जर तुम्ही मला पूर्ण वेळ आणि व्यावहारिक काँग्रेस अध्यक्ष म्हणण्याची परवानगी दिली तर मी आहे. तसेच काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी आत्मसंयम आणि शिस्त आवश्यक आहे. संपूर्ण संघटनेला काँग्रेसचे पुनरुज्जीवन करायचे आहे, पण या ऐक्यासाठी आणि पक्षाचे हित सर्वोपरी ठेवणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी आत्म-नियंत्रण आणि शिस्त आवश्यक आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!