जालना – राज्यावर सध्या विजेचे संकट घोंगावत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य करत महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. केंद्राची राज्य सरकारकडे कोळशाची 3000 हजार कोटींची थकबाकी राहिली आहे. मात्र बाकी असली म्हणून केंद्राने राज्याची कोणतीही अडवणूक केली नाही असा दावा दानवे यांनी केला आहे.
राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि बाहेरून वीज खरेदी करून नफेखोरी करण्याचा उद्देश यामुळे राज्यात कोळशाची टंचाई जाणवत असल्याचा खळबळजनक आरोप देखील रावसाहेब दानवे यांनी केलाय. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दानवे यांनी केंद्रावर राज्यातील नेत्यांकडून करण्यात येत असणाऱ्या आरोपांचा समाचार घेतला.
रावसाहेब दानवे म्हणाले की, राज्य सरकारने वेळीच कोळसा खरेदी केला असता तर संभाव्य वीज संकट टळले असते. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजन तसेच राज्य सरकारला नफेखोरी करण्यासाठी बाहेरून वीज खरेदी करायची असल्याने राज्यात कोळसा टंचाई निर्माण झाली आहे. देशात कोळशाचा मुबलक साठा उपलब्ध आहे. पण काही राज्यं राजकीय द्वेषापोटी केंद्रावर आरोप करताना दिसून येतात.
महत्वाच्या बातम्या
- खेळाडूंसाठी ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय; शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव
- देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये – रावसाहेब पाटील दानवे
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
