मुंबई : आज अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर ठाकरे सरकारवर टीकेचे रान उठले आहे.आधी तिचा भाऊ शौबीक चक्रवर्ती नंतर आता यामध्ये रियानंतर कुणाचा नंबर याची भीती सरकार ला वाटत आहे अशी टीका किरीट सोमैय्या यांनी केली आहे. याआधी या केसमद्ये आदित्य ठाकरे यांचा नाव आले असून आता या टीकेनंतर राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘रियाला अटक झाली आहे, आता पुढची चौकशी आणि अटक कोणाची होणार? याची भीती ठाकरे परिवार आणि सरकारला वाटत असेल,’ असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
‘ठाकरे सरकारने ६० दिवस हे प्रकरण दाबून ठेवलं. सीबीआयने फक्त २ आठवड्यात करून दाखवलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायला हवी. तसंच मुंबई पोलीस आयुक्तांची घरवापसी झाली पाहिजे,’ अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
ओरडून बोलल्याने कोरोना होतो, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर घणाघात
राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेची देवेंद्र फडणवीसांनी काढली लक्तरे
पासवानांचा नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यास नकार, एनडीएत फुट पडण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

