Share

ओरडून बोलल्याने कोरोना होतो, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर घणाघात

Published On: 

मुंबई : ठाकरे सरकार करोनाबाबत गंभीर नाही. त्यांचे निर्णय आणि नियम केवळ कागदावरच असून त्याची अंमलबजावणी होत नाही, अशा शब्दात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली.

सभागृहात पत्रकार अर्णब गोस्वामींवर हक्कभंग आणण्यापेक्षा करोनावर, शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर, पूरस्थितीवर चर्चा होणे आवश्यक आहे. ती होणार नसेल तर आम्ही इथे आलो कशाला, असा सवाल करीत फडणवीस यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहे.करोना संकटाच्या काळात सरकारवर टीका करण्याची आम्हाला हौस नाही. या काळात आम्ही संयमानेच वागेलो आहोत. मात्र, सरकार करोनाबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही. असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने कोरोना होतो, अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ते मंगळवारी विधानसभेत बोलत होते.

तर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीचे ब्लू आय बॉय आहेत. त्यांनी केंद्राला सांगून महाराष्ट्राला कोरोनाच्या उपचारासाठी पुरवण्यात येणाऱ्या साहित्यसामुग्रीचा पुरवठा सुरु ठेवावा, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांन केले आहे. ते मंगळवारी विधानसभेत बोलत होते.

यावेळी राजेश टोपे यांनी म्हटले की, केंद्र सरकारकडून राज्यांना कोरोनाच्या उपचारांसाठी करण्यात येणारा साहित्यसामुग्रीचा पुरवठा १ सप्टेंबरपासून बंद झाला आहे. त्यामुळे हे साहित्य खरेदी करण्यासाठी राज्य सरकारला ३०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. परंतु, दिल्लीचे ब्लू आय बॉय असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतल्यासे हे पैसे वाचू शकतात. त्यांनी केंद्राला यासंदर्भात सांगावे. जेणेकरून राज्याचे ३०० कोटी रुपये वाचतील, असा दावा राजेश टोपे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

‘दाऊदने नाही तर नाही पण किमान अब्दुल खाटकाला तरी थोरातांना फोन करायला सांगा’

‘अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिलं’, प्रवीण दरेकरांचा टोला

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचं पंकजा मुंडेंनी केलं तोंडभरून कौतुक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!