पटना : बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून सगळे पक्ष कामाला लागले आहेत.सत्ताधारी जेडीयू,लोजप आणि भाजपमध्ये तिकीटवाटपावरुन व सत्तेवरील वर्चस्वावरुन खटके उडत आहेत.लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असुन पुरामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. एससी एसटी समाजातील लोकांच्या हत्या केल्या जात आहेत. मुख्यमंत्री नितिशकुमारांंनी सरकारी नोकरीचे आश्वासन तरुणांना दिले होते. त्यांंच्या घोषणा निव्वळ जनतेला दिलेली थाप असून त्यांची प्रतिमा मुख्यमंत्री म्हणून नकारात्मक झाली आहे. असे खासदार चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.
जनता दल यूनाटेडनेही चिराग यांच्या टिकेचं उत्तर दिले असून चिराग पासवान सातत्याने चुकीचे विधानं करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री नितिश कुमारांवर आधी टीका बंद केली पाहिजे. आमची यूती भाजपशी आहे लोजपाशी नाही, असं पक्षाचे सरचिटणीस त्यागी यांनी म्हटलं आहे.
आगामी ऐन बिहारची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रीय जनता दलाच्या 12 आमदारांनी राजीनामे दिले आहेत.अशा पद्धतीने आमदारांच्या राजीनाम्याने माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांंचा पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. तेजस्वी यादव यांच्यात समन्वयाचा अभाव आणि टिकीट वाटपावरुन नाराजी ही दोन कारणं या आमदारांच्या राजीनाम्याला असल्याची सांगितली जात आहे.बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलापुढचं संकट वाढत आहे. ७० दिवसात आरजेडीच्या १२ आमदार आणि एमएलसीने पक्ष सोडला आहे. या सर्व नेत्यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडी-यू) मध्ये प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
हक्कभंग, अनधिकृत बांधकाम नोटिशीनंतर आता कंगनाची ड्रग्ज प्रकरणी देखील होणार चौकशी
देवेंद्र फडणवीस हे दिल्लीचे ब्लू आय बॉय, राजेश टोपेंचा घणाघात
आम्ही रात्रीची कामे दिवसा करतो, उद्धव ठाकरेंची तुफान फटकेबाजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

