Share

विधानसभा अध्यक्षांची माळ कुणाच्या गळ्यात? आज होणार निर्णय

Published On: 

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra MLS Winter Session) आजपासून सुरु होत आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते यंदा मात्र ते मुंबईत होणार आहे. २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. आज (२२ डिसें.) ठाकरे सरकारमधील विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिवाळी अधिवेशनात भाजपा विविध मुद्द्यांवरुन ठाकरे सरकारला घेरणार आहे. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, मराठा आणि ओबीसी राजकीय आरक्षण, महिला सुरक्षा, टीईटी पेपरफुटी, म्हाडा भरती गोंधळ, आरोग्य भरती गोंधळ, महावितरणकडून करण्यात येणारी सक्तीची वीजबिल वसुली आदी प्रश्नावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित रहाणार आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी काही काळातच या पदाचा राजीनामा दिला. गेल्या अधिवेशनाचे कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाहिलं होतं. विधानसभा अध्यक्षपद आताही काँग्रेसकडेच जाण्याची शक्यता आहे. मात्र उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या निवडीची सर्वांनाच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!