Share

..तर यंदा औरंगाबादेतील क्रांती चौकात थाटात साजरी होणार शिवजयंती!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याच्या कामाची सोमवारी (दि.२०) मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी समाधान व्यक्त करून सूचना दिल्या. ५ जानेवारी पर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण करा असे आदेश यावेळी पाण्डेय यांनी दिले आहेत. गेल्या ३ वर्षांपासून हे काम सुरू असल्याने दरवर्षी शिवजयंतीला शिवप्रेमींचा हिरमोड होतो. मात्र यंदा ५ जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण झाल्यास यंदाची शिवजयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी होणार यात शंकाच नाही.

क्रांती चौक हे शहराचे हृदय आहे. आणि येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहराची आण-बाण-शान समजला जातो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम गेल्या २ वर्षांपासून रखडले आहे. हे काम १९ फेब्रुवारी २०१८ ला शिवजयंतीचे औचित्य साधून सुरु करण्यात आले होते. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विशेष महत्त्व आहे. याठिकाणाहून अनेक सामाजिक, राजकीय चळवळी सुरू झाल्या. क्रांती चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी शिवप्रेमींतून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती.

वारंवार पाठपुरावा करून महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर १९ फेब्रुवारी २०१८ ला कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तत्कालीन महापौर नंदकुमार घोडेले यांनी हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा शब्दही दिला होता. कंत्राटदार नियुक्त करण्यात पालिकेचे वर्ष वाया गेले. नंतर पुढे गायत्री आर्किटेक कंपनीला हे काम दिल्यानंतर कंत्राटदाराने आधी पैसे द्या, अशी अडवणूक करत संथ गतीने काम सुरू केले.

त्यामुळे आजवर हे काम पूर्ण झालेले नाही.दरम्यान, पालिकेले छत्रपती शिवरायांचा २१ फुट उंचीचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. त्याचीही निविदा प्रक्रिया राबवून एजन्सीला काम देण्यात आले आहे. मात्र आता लवकरच शिवप्रेमींची प्रतिक्षा संपणार आहे. ५ जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत. यावेळी शहर अभियंता एस.डी पानझडे, नगररचना उपसंचालक ए. बी. देशमुख आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!