Share

बदनापूर नगर पंचायतीत बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत; आ. नारायण कुचे-संतोष सांबरेत हमरीतुमरी..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : बदनापूर नगर पंचायत निवडणुकीत मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आमदार नारायण कुचे(Narayan Kuche) व माजी आ. संतोष सांबरे(Santosh Sambare) यांच्यात बोगस मतदानावरून चांगलीच हमरीतुमरी झाल्याचा प्रकार समोर येत आहे. बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारीनंतर वाॅर्ड क्रमांक १२ व १४ मधील मतदान केंद्रावर सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत वेळीच दोन्ही गटांना पांगवल्याने पुढील अनर्थ टळला.

बदनापूर नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपामध्ये जोरदार सामना रंगत असल्यामुळे निवडणुकीत रंगत आलेली आहे. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये उत्साह होता. दरम्यान, वॉर्ड क्रमांक १२ व १४ मध्ये मात्र बोगस मतदानाच्या कारणावरून शिवसेना- भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी व शिवीगाळ झाली. यावेळी बोगस मतदार मतदानासाठी आणल्याच्या कारणावरून आ. नारायण कुचे व माजी आ. संतोष सांबरे, भरत सांबरे यांच्यात चांगलीच हमरी-तुमरी होऊन कार्यकर्त्यांची रेटारेटी झाली.

पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत दोन्ही बाजूच्या गटांना पांगवल्याने तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. दरम्यान, माजी आ. संतोष सांबरे यांनी या बाबत बोलताना सांगितले की, महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढवल्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांनी बोगस मतदार आणण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. मात्र, शिवसैनिकांसह आम्ही प्रत्यक्ष जाऊन हा प्रयत्न हाणून पाडल्याचे सांगितले. तर भाजपचे आ. नारायण कुचे म्हणाले की, भाजपच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मला शिवीगाळ करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!