Share

राहुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोणाला संधी देणार?

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवीत ते नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. परंतु अवघ्या तीन वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील जनतेने तनपुरे यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पाठविले. प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

त्यामुळे, नगराध्यक्षपद रिक्त होते. नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अनिता पोपळघट व अनिल कासार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येत्या शुक्रवारी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाचे असल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. आता प्राजक्त तनपुरे नगराध्यक्ष पदासाठी वरील दोघांपैकी कोणाला संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

अनिता पोपळघट यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नंदकुमार तनपुरे, तर अनुमोदक म्हणून प्रकाश भुजाडी यांच्या सह्या आहेत. अनिल कासार यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून राधा साळवे व अनुमोदक म्हणून संगीता आहेर यांच्या सह्या आहेत. राहुरी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाचे पूर्ण बहुमत आहे. जनसेवा मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रसाद तनपुरे, राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, पालिकेतील गटनेत्या डॉ.उषा तनपुरे, मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बैठकीनंतर एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यामुळे, ते आज राहुरीत येणार असल्याचे समजते. त्यानंतर ते नगराध्यक्ष पदासाठी कोणाला संधी देतात याकडे राहुरी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

महतवाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!