Share

फुल नहीं चिंगारी है! फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह होणार राफेलच्या पहिल्या महिला वैमानिक

Published On: 

नवी दिल्ली : फ्रान्स बनावटीचे असलेल्या शक्तिशालअली राफेलचा समावेश भारतीय वायुदलात झाला आणि शत्रूच्या काळजात धडकी भरली. काही दिवसांपूर्वी भारतीय लष्करी अधिकारी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या रक्षामंत्री फ्लोरेन्स पार्ली यांच्या उपस्थितीत राफेलचा भारतीय सैन्यात अधिकृतपणे समावेश करण्यात आला.

आता भारताच्या शिरपेचात आणखी एक अभिमानाचा तुरा रोवला जाणार आहे. ” फुल नहीं, चिंगारी है! ये भारत कि नारी है…अबला नाही तुफान है, ये भारत कि शान है!” या वाक्यांना समर्पक बाब आता समोर येत आहे. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणाऱ्या पाहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान मिळाला आहे.

देशात नुकत्याच सामील झालेल्या सर्वात शक्तिशाली विमानाचं सारथ्य करायला मिळाल्याने कुटुंबात उत्साहाचं वातावरण शिगेला गेलं आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या असलेल्या शिवांगी सिंह कन्वर्जन ट्रेनिंग पूर्ण करताच हवाई दलाच्या अंबाला एअरबेसमधील 17 गोल्डन एरोज स्क्वॉड्रनमध्ये औपचारिक प्रवेश करतील. एखाद्या वैमानिकाला एका लढाऊ विमानातून दुसऱ्या लढाऊ विमानात स्वीच करण्यासाठी कन्वर्जन ट्रेनिंग घेण्याची आवश्यता असते. सध्या त्या मिग 21 या लढाऊ विमानाच्या वैमानिक आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!