Share

मराठा महासंघाच्यावतीने जिल्ह्यातील मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर होणारे आंदोलन स्थगित

Published On: 

🕒 1 min read

हमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्य सरकारने येत्या आठ दिवसांत मराठा आरक्षण संदर्भात अध्यादेश काढावा अन्यथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकरी मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आला होता.

या पार्श्‍वभूमीवर शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी प्रमुख पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुंबईत मंत्रालयामध्ये भेट घेतली. बैठकीत झालेल्या समाधानकारक चर्चेनंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा दहातोंडे यांनी केली आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी आंदोलकांना शासनाने उचललेल्या पावलांची माहिती दिली. महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी यासाठी खंडपीठाकडे विनंती अर्ज केला आहे. महाराष्ट्र शासन आरक्षण टिकावे यासाठी गंभीर असून शासन म्हणून सर्वतोपरी काळजी घेत प्रभावीपणे न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचे काम करत असल्याची माहिती ना.

थोरात यांनी शिष्टमंडळाला दिली. ना.थोरात यांच्या समवेत झालेल्या समाधानकारक चर्चेमुळे जाहीर करण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी मुंबईतून केली.

अहमदनगर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या माध्यमातून शिष्टमंडळाने ना.थोरात यांची भेट घेतली. यावेळी मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत कराळे, रावसाहेब मरकड आदी उपस्थित होते.

महतवाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!