🕒 1 min read
नागपूर : शहरावरचे कोरोनाचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. या विरोधात सर्व राजकीय पक्ष एक होऊन लढत असल्याचे स्थानिक नेते सांगत असले तरी, ते केवळ बोलण्यासाठीच असल्याचे सर्वमान्य आहे. काहींना तर या माध्यमातून एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्याचाही इरादा असल्याचे जाणवते आहे. नुकतेच शिवसेनेने पूर्व नागपुरातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते गळाला लावले आहेत. त्यामुळे आता कॉंग्रेसही चुपचाप बसेल असे वाटत नाही. कॉंग्रेसनेही शिवसैनिक फोडण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे.
शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आल्याचे चित्र सध्या प्रकर्षाने देसत असून, राजकीय पक्ष त्या दिशेने तयारीला लागले आहेत. शिवसेनेने कॉंग्रेस कार्यकर्त्यांची चालवलेली फोडाफोड हे त्याचेच द्योतक असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस कमिटीचे महासचिव अंगद हिरोंदे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश घेतला.
अंगद छत्तीसगढी युवा ब्रिगेडचे अध्यक्ष व अ.भा. तेली महासंघाचे प्रदेश सचिव आहेत. ते काँग्रेसचे असले तरी भविष्यात याचा सर्वाधिक फटका भाजपला बसू शकतो. पूर्व नागपूरमध्ये तेली आणि छत्तीसगडी समाज मोठ्या प्रमाणात आहे. हे बघता महापालिकेच्या निवडणुकीत याचा शिवसेनेला चांगला फायदा होऊ शकतो. इतकेच नव्हे तर सेनेचेही काही कार्यकर्ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
अंगद यांच्यासोबत गोपाल वाघ, आल्हाद खरे, जगदीश पटोडी, मनोज शाहू, मुकेश यादव, रवी शाहू, जोहन शाहू, विनोद उइके, पिंटू शाहू, बसंत वर्मा, किशोर कुरवे, शैलेश माहेश्वरी, राकेश हिरवानी, प्रकाश बर्मन, जीतू महिलांगे, कैलाश बर्मन, आत्मा बाडाबाग, आत्मा हिरवानी, सुखचंद यादव,हेमंत ब्रम्हे,अजय सबरसांठी, शैख महफूज,दीना शाहू, तुलसी शाहू, रवी वाघमारे,भारत सरवा, हेमरू शाहू, राजूभाई जुम्मन,श्रीकांत रेकुलवार, चैतराम शाहू,अनिल गायागवाल,नीलेश बघेल,आकाश बंजारे, संतोष शाहू यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला पूर्णपणे न्याय देण्याच्या भूमिकेत नाही
- कोल्हापूरातील गोलमेज परिषदेत मराठा समाजाचे ‘हे’ महत्वाचे ठराव!
- मुंबई पाण्यात गेली, आता तरी दार उघड ‘भावा’ दार उघड…
- प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण…
- भाजपला उपरती, कंगनाच्या चौकशीचे केले समर्थन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
