पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने २१ पैकी १६ जागा जिंकत बँकेवर एकहाती वचर्स्व सिद्ध केले आहे. येत्या १५ जानेवारी रोजी अध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या पदासाठी राष्ट्रवादीचे तिघे रेसमध्ये असून उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अध्यक्ष पदासाठी आमदार अशोक पवार, विकास दांगट आणि दिगंबर दुर्गाडे यांची नावं चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी येत्या शनिवारी, १५ जानेवारीला दुपारी एक वाजता बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची पहिली बैठक बोलावण्यात आली आहे. यात अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर घटनात्मक तरतुदींनुसार करायच्या इतर अनेक गोष्टी का डावलल्या जातात?’
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
- भारतीय जवानांच्या धैर्यापुढे साक्षात हिमालय सुद्धा झुकला; व्हिडीओ व्हायरल
- पुण्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ; महापौर म्हणाले…
- ‘राबडीदेवी म्हटलं फूलन देवी नाही’; रश्मी ठाकरेंवरच्या ‘त्या’ व्यक्तव्याला चंद्रकांत पाटलांचे समर्थन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

