नवी दिल्ली : बहोत हो गयी महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार ! असे म्हणत २०१४ साली भाजप सरकार सत्तेत आले खरे पण आज ७ वर्षानंतर जनतेवर महागाईचा असा मारा होत आहे कि लोकांच्या तोंडातून आपसूक ‘अबकी बार महंगाई की मार !’ असेच शब्द निघत आहेत.
देश आज कोरोनाच्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या, ऑक्सिजनचा मोठा तुटवडा, बेड्सची कमतरता अशा अनेक समस्यांचा सामना देशाला करावा लागत आहे. याच दरम्यान सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून घाऊक महागाईच्या दराची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. घाऊक बाजारात महागाई दर पाहता चिंता वाढली आहेत. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील महागाई दर वाढला आहे. मार्च महिन्यात महागाई दर हा 7.39 टक्के इतका होता. तर एप्रिलमध्ये या दराने रेकॉर्ड मोडला आहे. महागाई दर तब्बल 10.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई दरात एका महिन्यात जवळपास 3.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. कच्चं तेल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्याने हा महागाई दर वाढल्याचं सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- लसींचा साठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये राहणार लसीकरण पूर्ण बंद
- तौक्ते वादळ हे राष्ट्रीय वादळ, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये : अमोल मिटकरी
- औरंगाबादेत कोरोना रुग्णांसाठी गॅस दाहिनीचे काम वेगात!
- हुश्श… ! कोरोनाची दुसरी लाट लवकरच संपणार…
- असे चक्रीवादळ मुंबई पहिल्यांदाच अनुभवतीये ; आदित्य ठाकरेंनी घेतला कंट्रोल रुममधून आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
