औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा अंत्यसंस्कारासाठी रुग्णांच्या नातेवाईकांवर ताटकळण्याची वेळ आली आहे. ही अडचण दूर करण्यासाठी महापालिकेने कैलासनगर स्मशानभुमीत गॅस दाहिनी बसविण्याचे काम गतीने हाती घेतले आहे. औरंगाबाद फस्ट या संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
औरंगाबाद शहरात कोरोनाच्या दुसर्या लाटेने चांगलेच थैमान घातले आहे. अवघ्या अडीच महिन्यात ८३ हजार नागरिक बाधित झाले असून त्यापैकी ८२ हजार उपचार घेऊन घरी परतले आहेत. या अडीच महिन्यात शहरात सातशेपेक्षा अधिक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर पालिकेच्या यंत्रणेकडून अंत्यसंस्कार केले जातात. शहरातील १६ स्मशानभुमी व दफनभुमीत ही व्यवस्था केली आहे.
अंत्यसंस्कारासाठी लाकडे मोठया प्रमाणात वापरले जात असल्याने आता लाकडाची टंचाई भासत आहे. त्यातच प्रदुषण आणि पर्यावरणाला होणारा धोका लक्षात घेऊन औरंगाबाद फस्ट संस्थेने गॅस दाहिनी सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार पालिकेने या संस्थेसोबत सामंजस्य करार केला. कैलासनगर स्मशानभुमीत गॅस दाहिनी उभारण्याच्या कामाला सुरूवात केली. दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. पालिकेकडून देखभाल व दुरुस्तीसाठी लागणारा खर्च केला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हुश्श… ! कोरोनाची दुसरी लाट लवकरच संपणार…
- असे चक्रीवादळ मुंबई पहिल्यांदाच अनुभवतीये ; आदित्य ठाकरेंनी घेतला कंट्रोल रुममधून आढावा
- पिंपरी-चिंचवडमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला; वायसीएममध्ये १२ रुग्णांचा मृत्यू
- कोरोनाची दुसरी लाट, औरंगाबादेत पंधरा दिवसात कोरोनाने घेतला ‘एवढ्यांचा’ बळी!
- ‘म्युकरमायकोसीस साठी स्वतंत्र उपचार केंद्र करा’, आ. अभिमन्यू पवार यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

