मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले आहे. देशात दररोज ४ लाखांहून अधिक नवे कोरोना बाधित रुग्ण सापडत होते. मात्र ९ मेनंतर कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होऊ लागली आहे. त्यामुळे देशाला संकटात टाकणारी कोरोनाची ही दुसरी लाट आता ओसरणार का ? असा प्रश्न विहाराला जाऊ लागला आहे.
कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार या प्रश्नाचे उत्तर आता सफदरजंग रुग्णालयातील कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक आणि मुख्य डॉक्टर जुगल किशोर यांनी दिले आहे. जर सारे काही व्यवस्थित घडले तर कोरोनाची दुसरी लाट कमाल दहा दिवसांपासून ते दोन आडवड्यांदरम्यान संपुष्टात येईल, अशी शक्यता डॉ. जुगल किशोर यांनी वर्तवली.
भारतामधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे ओसरणे हे अनेक बाबींवर अवलंबून आहे. यामध्ये सर्वात प्रमुख आहे ते म्हणजे आपण सर्वांनी कोविडबाबतच्या नियमांचे कठोरपणे पालन करावे आणि या विषाणूला रोखण्यासाठी आपली भूमिका पार पाडावी. मात्र जर रस्त्यांवर लोकांची गर्दी कायम राहिली. बाजारात वर्दळ राहिली तर कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा कालावधी तेवढाच अधिक प्रमाणात वाढेल. याशिवाय लसीकरणाचा वेग वाढवला आणि अधिकाधिक लोकांचे लसीकरण केले तर आपण या लाटेला वेळेवर थोपवण्यात यशस्वी ठरू. लस मिळाल्याने या विषाणूला पसरण्यापासून रोखता येऊ शकेल. असे डॉ. जुगल किशोर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘म्युकरमायकोसीस साठी स्वतंत्र उपचार केंद्र करा’, आ. अभिमन्यू पवार यांची मागणी
- भाजपचे आरोप खोटे; अजितदादांनी सांगितलं भारत बायोटेकला पुण्यात जागा देण्याचं कारण
- मदत कार्य वेगाने सुरु ठेवा ; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
- ‘मी गोमूत्र पिते, त्यामुळेच मला कोरोना झाला नाही’, भाजप खा.साध्वी प्रज्ञा सिंह यांचा दावा
- पुणेकरांनी करून दाखवलं ! नव्या कोरोनाबाधितांची संख्या तीन अंकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
