पुणे : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राज्यात सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद असून ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. मात्र लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे पुण्यातील लसीकरण आज म्हणजेच १७ मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला होता. परंतु लसींचा अजूनपर्यंतही पुरवठा न झाल्यामुळे मंगळवारी म्हणजे उद्यादेखील पुण्यातील सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापौर मोहोळ यांनी दिलेली आहे.
तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस देखील शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या मंगळवारी कोणत्याही वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महत्वाच्या बातम्या
- तौक्ते वादळ हे राष्ट्रीय वादळ, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये : अमोल मिटकरी
- भाजपचे आरोप खोटे; अजितदादांनी सांगितलं भारत बायोटेकला पुण्यात जागा देण्याचं कारण
- हुश्श… ! कोरोनाची दुसरी लाट लवकरच संपणार…
- ‘मी गोमूत्र पिते, त्यामुळेच मला कोरोना झाला नाही’, भाजप खा.साध्वी प्रज्ञा सिंह यांचा दावा
- पुणेकरांनी करून दाखवलं ! नव्या कोरोनाबाधितांची संख्या तीन अंकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

