Share

कोण मारणार बाजी? मुंबई आणि दिल्लीमध्ये होणार फायनलच्या तिकिटासाठी टक्कर

Published On: 

दुबई : आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यासाठी आता चार संघांचं स्थान निश्चित झालं असून ते जोर लावताना दिसत आहेत. आयपीएल प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणायसाठी मुंबई इंडियन्स वगळता इतर संघांना यंदा चांगलाच संघर्ष करावा लागला.

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३०  वाजता दुबईमध्ये खेळला जाईल. या सामन्यातील विजयी संघाला थेट अंतिम सामन्यात प्रवेश मिळेल आणि पराभूत झालेल्या संघाला अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळेल.

पराभूत संघाचा सामना एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याशी होईल क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेल्या संघाचा सामना ६ नोव्हेंबरला होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघाशी होईल. या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामना खेळेल. अबुधाबी येथे शुक्रवारी एलिमिनेटर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे.

गुणतालिकेत मुबंई आणि दिल्ली अव्वल दोनमध्ये साखळी फेरीत मुंबई व दिल्ली उत्कृष्ट कामगिरी करत गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर आहेत. मुंबईने १४  पैकी ९  सामने जिंकले आहेत आणि ५  गमावले आहेत. या संघाने १८ गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे. दुसरीकडे दिल्लीने १४ पैकी ४ सामने जिंकले आहेत आणि ६ गमावले आहेत. हा संघ १६ गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.

आय पी एल च्या या हंगामात दिल्लीचा दोन्ही वेळा मुंबईकडून पराभव झाला आहे. हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले. मुंबईने दोन्ही वेळा दिल्लीचा पराभव केला. आजच्या सामना बगण्यागोजे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!