Share

कोण होणार विजयी, दानवे की कुलकर्णी? औरंगाबाद-जालनाकडे सर्वांचे लक्ष्य

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी (ता. 19) मतदान झाले आणि घोडेबाजाराची चर्चा रंगायला सुरवात झाली. एकूण 657 पैकी 647 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. औरंगाबादेतील तीन तर जालन्यातील सात जणांनी मतदानाला दांडी मारली. दरम्यान, महायुतीचे अंबादास दानवे की आघाडीचे बाबूराव कुलकर्णी यापैकी कोण विजयी होणार, याचा निकाल आता गुरुवारी (ता.22) दुपारपर्यंत लागेल. सकाळी आठ वाजता चिकलठाणा मेट्रॉन कंपनीमध्ये मतमोजणीस सुरवात होणार असून, अवघ्या अडीच तासांत निकाल हाती येणार आहे.

सर्वच पक्ष सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तत्पूर्वी होत असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला वेगळे महत्त्व आहे. महिनाभरापासून औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची चर्चा सुरू आहे. चर्चेत असलेली नावे अचानक स्पर्धेतून बाहेर गेली आणि महायुतीकडून दानवे, तर आघाडीकडून कुलकर्णी यांची लॉटरी लागली. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष झांबड यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवल्याने उमेदवारीची माळ कुलकर्णी यांच्या गळ्यात पडली; तर युतीकडून खोतकर, वैद्य, त्रिवेदी यांच्यावर मात करीत दानवे यांनी बाजी मारली.

महायुतीचे पारडे जड

संख्याबळाचा विचार केला तर महायुतीचे पारडे जड आहे. विजयासाठी आवश्यक असलेले बहुमत जवळ असतानाही दानवे यांनी अतिरिक्त मतांची जमवाजमव करीत स्वतःला सुरक्षित करून घेतले. त्यामुळेच महायुतीचे दानवे हे विक्रमी मतांनी निवडून येतील असा दावा केला जात आहे. शिवसेना-भाजप दोन्ही पक्षाचे मिळून 333 सदस्य आहेत. याशिवाय कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार समर्थक चाळीसहून अधिक सदस्यही दानवे यांच्या पाठीशी उभे राहिले, अशी चर्चा होती. आघाडीकडील 250 कुलकर्णींना पडतील का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.

एमआयएमच्या सदस्यांनी बजावला हक्क

एमआयएमच्या 29 सदस्यांपैकी 28 जणांनी आपल्या मताचा अधिकार बजावला. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात लढूनच एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला होता. वैचारिकदृष्ट्या शिवसेना-भाजप आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्याशी एमआयएमचे पटत नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्यासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली होती. अशावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज यांनी नगरसवेकांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले, अशी चर्चा होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!