Share

वैजापूरच्या मतदारांची ओळख झाली ‘डिजिटल’

Published On: 

पैठण : मतदारांना आता डिजिटल ओळखपत्र मिळणार आहेत. तेही आपल्या मोबाईल व कम्प्युटरवरुन ते डाऊनलोड करू शकणार आहेत. निवडणूक आयोगाने या संदर्भात मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ज्या मतदारांनी २० नोंव्‍हेबर २०२० नंतर मतदार यादीमध्ये नाव नोंदणी तसेच मतदार ओळखपत्र दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज केले होते. अशा सर्व मतदारांसाठी हे डिजिटल ओळखपत्र लाँच करण्यात आलेले आहे.

या संदर्भात तहसील कार्यालय पैठण येथे ११० पैठण विधानसभा मतदार क्षेत्रातील ११०९ मतदारांचे ओळखपत्र नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे ओळखपत्र डाऊनलोड करून घेण्यासंदर्भात सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचामार्फत मतदारांना आवाहन करण्यात आलेले आहे.

या संदर्भाने तहसील कार्यालय पैठण येथे सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार पैठण यांच्या हस्ते मतदारांना डिजिटल ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी नव मतदार फराह शेख ओळखपत्र क्रमांक यांना डिजीटल ओळखपत्र वाटप करुन अभिनंदन करण्‍यात आले. हे पत्र कसे डाऊनलोड करावे याचे या संदर्भात माहिती देण्यात आली. या संदर्भातील जनजागृती आणि माहिती प्रसिद्ध करणे या संदर्भात तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पैठण तहसील कार्यालयात नायब तहसीलदार संतोष अनर्थे, अमोल पाखरे, निवडणूक सहायक जनार्दन दराडे, चैतन्य गोसावी, श्रीकांत गमे, शेख के एच, दादासाहेब गटकळ, नामदेव नरवडे, इम्रान शेख हे उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!