🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. यावर भाजपचे नेते नितेश राणेंनी महाविकास आघाडीवर ट्विट करून जोरदार टीका केली आहे टीका केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे पुण्यात परीक्षार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. पुण्यातील नवी पेठे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
‘MPSC च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या.. परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे वय वाढत चालले आहे.. मुलांचे वय कसे कमी करणार? ह्यांची मुले परीक्षेला बसली नाही म्हणून.. वाटेल ते निर्णय घेत आहेत!!! फक्त MPSC परिक्षेमध्येच कोरोना होणार.. रात्री च्या पार्टी मध्ये नाही ??’ असं ट्विट भाजपाचे नेते नितेश राणेंनी केलं आहे.
MPSC च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या.. परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे वय वाढत चालले आहे..
मुलांचे वय कसे कमी करणार?
ह्यांची मुले परीक्षेला बसली नाही म्हणून.. वाटेल ते निर्णय घेत आहेत!!!
फक्त MPSC परिक्षेमध्येच कोरोना होणार.. रात्री च्या पार्टी मध्ये नाही ??— Nitesh Rane (@NiteshNRane) March 11, 2021
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.
१४ मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत.त्यामुळे परीक्षा घेणे योग्य नसल्यानं ती पुढे ढकलण्यात यावी, असं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून लोकसेवा आयोगाला कळवण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मनपाने विधी विद्यापीठाकडून वसूल केले पाणीपट्टीचे २५ लाख
- वरळीत पब सुरू राहू शकतात मग महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा का होऊ शकत नाही ?
- आमदार सुरेश वरपुडकरसह कुटूंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह
- मोठी बातमी : गोपीचंद पडळकरांसह पुण्यातील एमपीएससीचे हजारो विद्यार्थी आक्रमक; वातावरण चिघळले
- हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये पहिलं शाही स्नान संपन्न…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
