🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीबाबत प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार बुधवारी (दि.१०) स्पेशल मालमत्ता कर वसुली टास्क फोर्स प्रमुख अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी टास्क फोर्सच्या वतीने कारवाई करण्यात आली. विशेषतः कांचनवाडी येथील महाराष्ट्र विधी विद्यापीठाकडे पाणीपट्टीचे २५ लाख थकीत होते. यावेळी पथकाने हे पैसे वसूल केले.
यात झोन 3 अंतर्गत जफर खान यांनी त्यांचे कडील थकीत रक्कम 1,23, 735 रु पुढील तारखेचा धनादेशद्वारे पथकाकडे भरणा केला. झोन 3 अंतर्गत म्हाडा कॉलनी येथील डी डी शिंदे यांनी 63,955 रु पुढील तारखेचा धनादेश द्वारे पथकाकडे भरणा केला. झोन 3 अंतर्गत गणेश कॉलनी येथील देविदास महधने यांनी मालमत्ताकर रु 1,09,145 रु पुढील तारखेचा धनादेश पथकाकडे भरणा केला.
झोन 3 अंतर्गत कैसर कॉलनी येथील रतन बुगले यांनी 72,120 रोख रक्कम पथकाकडे भरणा केले. झोन 5 अंतर्गत शिवनेरी कॉलनी येथील लाडवाल यांनी 24483 रु पथकाकडे भरणा केले.
झोन 8 अंतर्गत नक्षत्रवाडी येथील सुयोग जैन (रूनवाल) यांनी थकीत मालमत्ता कर रु 18,17,064 रु पथकाकडे धनादेश द्वारे भरणा केले. झोन 5 अंतर्गत सिडको एन-5 येथील संदीप अग्रवाल यांनी 50,000 रु पथकाकडे भरणा केला.
झोन 8 अंतर्गत कांचनवाडी येथील महाराष्ट्र विधी विद्यापीठ यांनी त्यांचे कडील थकीत पाणीपट्टी रक्कम 25,73,133 रु धनादेशद्वारे पथकाकडे भरणा केला. असे एकूण मिळून 48,33,635 रु थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूल करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- आमदार सुरेश वरपुडकरसह कुटूंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह
- मोठी बातमी : गोपीचंद पडळकरांसह पुण्यातील एमपीएससीचे हजारो विद्यार्थी आक्रमक; वातावरण चिघळले
- हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये पहिलं शाही स्नान संपन्न…
- लातूरमध्ये मद्यधुंद तरुणांचा धुडगूस, वाहनांच्या काचा फोडल्या
- उस्मानाबादेत दररोज दोन हजार चाचण्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
