Share

कोण देणार मुंबईला टक्कर ?, आज दिल्ली आणि हैद्राबादमध्ये अंतिम सामन्यासाठी रंगणार चुरस!

Published On: 

🕒 1 min read

युएई : एप्रिल-मे मध्ये होणारी आयपीएल यंदा कोरोनामुळे लांबणीवर पडली. फक्त देशातच नाही तर जगात क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या आयपीएलचा यंदाचा हंगाम होणार की नाही यावर प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, टी-२० विश्वचषक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला आणि आयपीएलच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला.

युएईमधील देशात आयपीएलचे १३वे सत्र पार पडत असून आता हे सत्र अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. कोरोनाच्या वातावरणातून आयपीएलने नवा उत्साह निर्माण केला होता. यावर्षी देखील प्ले-ऑफ गाठण्यासाठी संघांना चांगलाच सामना करावा लागला. पहिली क्वालिफायर जिंकून मुंबई इंडियन्सने थेट अंतिम सामन्यात धडक दिली तर द्वितीय स्थानावर असलेल्या दिल्लीला आणखी एक संधी आहे. तर, एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला धूळ चारत सनरायझर्स हैद्राबादने विजेतेपदाच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखलं.

आज, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद या संघांमध्ये क्वालिफायर-२ ची लढत रंगणार आहे. हा सामना आयपीएल विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश पक्का करण्यासाठी महत्वाचा असून फायनलच तिकीट कोणाला मिळणार हे आजच्या सामन्यातून स्पष्ट होणार आहे.

जो संघ आजचा सामना जिंकेल त्यांची लढत मागील वर्षीचे आयपीएल चॅम्पियन असलेल्या आणि याही वर्षी अंतिम सामन्यात पोहोचलेल्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे. युवा कर्णधार व यशस्वी कर्णधार म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या श्रेयस अय्यर अनुभवी व ज्येष्ठ असलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या संघाविरुद्ध कोणती रणनीती वापरणार याकडं आता क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!