Share

ही लेडी डॉन कोण? विचारणाऱ्या नवाब मलिकांना यास्मिन वानखेडेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या…

Published On: 

मुंबई : मुंबई ड्रग्ज प्रकरणी एनसीबीची कारवाई सुरू असतांनाच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे. फ्लेचर पटेल कोण? त्यांचा वानखेडेंशी काय संबंध, पटेलसोबत फोटोतली लेडी डॉन कोण? असे प्रश्न मलिक यांनी उपस्थित केले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे.

यासंदर्भात बोलतांना यास्मिन म्हणाल्या की, ‘कॅबिनेट मंत्री असे आधार नसलेले विधान करत आहेत. कोणतंही वक्तव्य करण्याआधी त्यांनी विचार करावा. माझा भाऊ योग्य कारवाई करत आहे. मी मनसे चित्रपट सेनेची उपाध्यक्ष आहे आणि कायदेशीर काम पाहते. माझ्या राजकीय पदाचा आणि माझ्या कामाचा त्यांनी आदर करायला हवा. समाजाला ते चुकीची प्रेरणा देत आहेत, त्यांना हे समजायला हवं. पुरावे द्या आणि मग बोला.’ तसेच कुणाला बदनाम करण्याचं काम आम्ही करत नाही. जे चांगलं काम करत आहेत. त्यांना बदनाम करु नका. नवाब मलिक यांनी भविष्यात असे आरोप केले तर त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला जाईल, कायदेशीर नोटीस पाठवली जाईल,’ असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, फ्लेचर पटेल यांनी देखील मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की,’आज जर आम्ही एनसीबीचे योद्धा झालो आहोत तर नवाब मलिकांना काय मिरच्या झोंबल्या आहेत हे प्रवीण दरेकर आणि फडणवीसांनी सांगितलंच आहे. तेव्हा मी मलिकांना विनंती करतो की विनाकारण कोणत्याही सैनिकाचे नाव घेऊ नका. माझा नंबर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे तुमचे कार्यकर्ते आहेतच. तुम्ही मला बोलावूही शकता, तुम्ही मोठे मंत्री आहात. पण कोणत्याही सैनिकाला किंवा गणवेशधारी अधिकाऱ्याला त्यांची कामाप्रती सचोटी दाखवण्यासाठी आपल्या परवानगीची गरज नाही. तुम्ही जर खरंच ड्रग्जच्या विरोधात आहात तर समोर या आणि आमच्या मोहिमेला पाठिंबा द्या. आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करा. मी तुमच्याच भागात तुम्हाला दाखवतो की कुठे कुठे काय काय सापडते.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!