Share

राज्यात रक्ताचा तुटवडा; आव्हाडांनी रक्तदान करत केल ‘हे’ आवाहन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

नागरिकांमध्ये कोरोनाची भीती मनात असल्यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात घटली असून विविध आजार, उपचारांसाठी रक्ताची मागणी मात्र वाढत आहे. यामुळे राज्यात रक्तसाठ्याची टंचाई निर्माण होत आहे. यामुळेच नागरिकांनी भीती न बाळगता मात्र योग्य ती खबरदारी घेऊन रक्तदान करावं, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल केल होत.

आव्हाड हे केवळ आवाहन करुनच थांबले नाही, तर त्यांनी स्वतः रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. ‘महाराष्ट्राच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ततुडवड्याची पार्श्वभूमीवर मी आज रक्तदान केल्याची  माहिती त्यांनी दिली आहे.

 

ते म्हणाले कि, मी मनापासून सर्वांनी पुढे यावे व रक्तदान करावे असे आवाहन पण त्यांनी यावेळी केल आहे. ते म्हणाले कि, एक थेंब शेअर करा, एक जीव वाचवा तसेच त्यांनी डोनेटब्लडसेव्हलाइव्ह्ज #DonateBloodSaveLives या हैशटैग चा सुद्धा वापर केला आहे.

काल आव्हाड यांनी ट्विट करत आवाहन केल होत, ‘राज्यात केवळ सात-आठ दिवस पुरेल इतका रक्तसाठा उरला आहे. आज कोरोनाला न घाबरता, सोशल डिस्टसिंग पाळून खासकरुन तरुण-तरुणींनी बाहेर पडून रक्तदान करावे. कुणाचे तरी प्राण वाचविण्यासाठी आपलं रक्त उपयुक्त ठरेल, ही भावना मनात ठेवून रक्तदान करा,’ असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं होत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!