नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राज्यसभेला संबोधित केले आहे. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार राज्यसभेच्या खासदारांना निरोप देण्यात आला. हे चारही सदस्य जम्मू काश्मिरचं प्रतिनिधित्व करत आहेत.
यावेळी मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्या आठवणींना उजाळा दिला. एका दहशतवादी घटनेचा संदर्भ देताना मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘मला चिंता आहे की गुलाम नबीजीनंतर जो कोणी हा पदभार स्वीकारेल त्याला गुलाम नबीजी यांच्यासारखं बनता येईल का? गुलाम नबी आझाद यांच्यानंतर त्यांच्या पदावर येणाऱ्या नेत्याला त्यांची उणीव भरून काढणे थोडे कठीण जाईल. कारण गुलाम नबी हे पक्षासोबतच देशहिताकडेही लक्ष द्यायचे’, असे म्हणत मोदींनी अजादांचे तोंडभरून कौतुक केले आहे. ‘पद, सत्ता जीवनात येत जात राहते. मात्र, ती कशी पचवावी हे आझाद यांच्याकडून शिकावे’, असे म्हणत मोदींनी सदनात त्यांना सलाम केला.
यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. ‘आज कुणीतरी मला व्हॉटसअपवर पाठवलं आहे की, मोदींना राज्यसभेत गहिवरुन आले. त्यामुळे खरे मोदी कोण?, हा प्रश्न पंतप्रधानांनाच विचारायला हवा, असे म्हणत भुजबळ यांनी मोदींना टोला लगावला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारसाहेबांवर टीका पण करतात. यू टर्न केल्याचेही बोलतात आणि युतीसुध्दा करतात’, असे भुजबळ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मायदेशातील पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक दणका !
- हेच खरं यश आहे; गडचिरोलीतील ‘हा’ बदल बघून तुकाराम मुंढेंनी केलं भरभरून कौतुक !
- जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार; राणेंचं शिवसेनेला आव्हान
- कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण
- चित्रपट सृष्टीवर शोककळा ! ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
