Share

जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार; राणेंचं शिवसेनेला आव्हान

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : देशाचे गृहमंत्री अमित शाह हे सिंधुदुर्ग दौरा आटोपून दिल्लीत परतत नाहीत तोच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातच भाजपला खिंडार पाडण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपच्या सात नगरसेवकांनी एकाचवेळी राजीनामा दिला असून हे सातही जण आज आपल्या हातावर शिवबंधन बांधणार आहे.

वैभववाडी नगरपंचायतीत १७ पैकी १७ नगरसेवक भाजपचे असून यातील सात नगरसेवकांनी सोमवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, संपदा राणे, रवींद्र तांबे, स्वप्निल इस्वलकर, संतोष पवार अशी या सात नगरसेवकांची नावे असून आणखी काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे. या नगरपंचायतीची निवडणूक लवकरच होणार असून त्याआधीच भाजपला मोठे खिंडार पडल्याने सगळीच गणितं बदलून गेली आहेत.

यावरून सद्या कोकणातील राजकीय वातावरण तापलं असून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे. ‘ जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार’ असा इशाराच राणेंनी दिला आहे. दरम्यान, हे सर्व नेते भाजप आमदार नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असा टोला विद्यमान शिवसेना नेते आणि पूर्वी नारायण राणे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सतीश सावंत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!