सोलापूर : राज्यात सद्या वेगवेगळ्या भागात बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याचे वृत्त दिवसेंदिवस वाढत आहे. करमाळा तालुक्यात दहशत माजवणारा बिबट्या वनविभागाच्या हातावर तुरी देऊन बिनधास्त वावरत होता. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
हा बिबट्या वांगी, सांगवी, ढोकरी, चिखलठाण, शेटफळ, उंदरगाव या भागातील ऊस व केळीच्या शेतात फिरत आहे. उसाची व केळीची दडण असल्याने वन विभागातील अधिकारी व शार्प शूटर यांना बिबट्यास जेरबंद तथा निशाणा साधण्यास कठीण जात होते. मात्र, अखेर या बिबट्याला मारण्यात यश आल्याचं समजत आहे.
या बिबट्याने सोलापूर भागातील ३ जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे वनविभागाने या बिबट्यास लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत होते. यानंतर, बारामतीहून खास शार्प शुटर देखील बोलावण्यात आला होता. मात्र, काही दिवस त्यांना देखील यश येत नव्हते. अखेर काही वेळापूर्वी या बिबट्याला संपवण्यात यश आलं आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी आता सुटकेचा निःश्वास जरी सोडला असला तरी वन्यप्राण्यांना वाचवण्याचे देखील महत्व जाणून या बिबट्याला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न प्रथम केले गेले. मात्र त्याचा कोणताही परिणाम बिबट्यावर झाला नाही.
बारामतीहून आलेल्या शार्प शूटरला या बिबट्याला संपवण्यात यश आलं आहे. यानंतर करमाळा भागातील गावांमध्ये जल्लोष केला जात आहे. बिबट्याला वांगी नंबर चार, राखुंडे वस्ती (ता. करमाळा) चार येथे शार्प शूटरने गोळ्या घालून ठार केले.
महत्वाच्या बातम्या
- समता परिषद म्हणजे ओबीसी समाज नाही; येत्या काळात तीव्र संघर्ष करण्याचा ओबीसी जन-मोर्चाचा इशारा
- ऑस्ट्रेलियाचा संघ ऑल-आऊट, भारताने घेतली तब्बल ‘इतक्या’ धावांची आघाडी!
- नव्या कृषि कायद्यांचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका : पंतप्रधान मोदी
- …म्हणून राहुल गांधींची बौद्धिक पातळी हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनू शकतो काय? भाजप नेत्याने उडवली खिल्ली
- भाजपशासित राज्यात पेट्रोल स्वस्त तर काँग्रेस-महाआघाडी शासित राज्यात पेट्रोल नव्वदी पार; भाजप नेत्याचा दावा


