Share

पंजाबने ५.२५ कोटी रुपयांची बोली लावलेला शाहरूख खान कोण आहे?

Published On: 

चेन्नई- इंडियन प्रीमिअर लीग साठी चेन्नईत मिनी लिलाव सुरू आहे.आयपीएलच्या इतिहासातील ख्रिस मॉरिस हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. भारताच्या युवराज सिंहचा विक्रम मॉरिसने मोडीत काढला आहे. दिल्लीने १६ कोटी रुपयांत युवराजला खरेदी केले होते. ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने २०२१ च्या आयपीएल लिलावात १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह देशांतर्गत स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंवरही संघ मालकांची नजर आहे. यात तमिळनाडूचा 25 वर्षीय विस्फोटक फलंदाज शाहरूख खान याने बाजी मारली असून  किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला आपल्या गोटात घेतले आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत तामिळनाडूच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारा शाहरुख खान याला प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्स संघानं ५.२५ कोटी रुपये मोजले. २० लाख बेस प्राईज असलेल्या शाहरुख खानसाठी एवढी मोठी रक्कम लागणे अपेक्षित होतेच, त्याला कारण ठरलं ते सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेतील त्याची फटकेबाजी.

त्यानं २२० च्या स्ट्राईक रेटनं तुफान फटकेबाजी केली.शाहरूख खान याने प्रथमश्रेणीचे 5 सामने खेळले असून यात त्याने 231 धावा केल्या आहेत. लिस्ट ए याच्या 20 लढतीत त्याने 286 धावा केल्या असून टी-20 मध्ये त्याच्या नावावर 31 लढतीत 293 धावांची नोंद आहे. बॉलिवूड स्टार शाहरुख खान याच्या नावावरूनच या क्रिकेटपटूचं नाव ठेवण्यात आलं असलं तर तो रजनीकांत याचा जबरा फॅन आहे. तामिळनाडू संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक यानंही शाहरुख खानचं कौतुक केलं होतं. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!