Share

फर्दापूर येथे दंगा काबू पथकाचे प्रात्यक्षिके

Published On: 

फर्दापूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात शांती व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने दि.18 गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास फर्दापूर (ता.सोयगाव) येथे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने पथसंचलन व दंगा काबू पथकाचे प्रात्यक्षिके केले.

या पथसंचालनास येथील ग्रामपंचायत कार्यालया समोरील मैदानातून सुरुवात करण्यात आल्यानंतर येथील मुख्यचौक,गांधी चौक व राममंदिर परीसरातील मार्गाने पोलिस पथकाच्या पथसंचलनाने मार्गक्रमण केले दरम्यान पथसंचालना दरम्यान पोलिस पथकाने विविध कवायती व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.

या पथसंचालनात सापोनि प्रतापसिंह बहूरे यांच्या नेतृत्वात पोउनि सुधाकर दौड सा.फौ.पोपटराव कांबळे,बबनराव धनवट पोलिस अमलदार बाजीराव धनवट,नारायण खोडे,दिपक सोनवणे,सुनिल भिवसने सचिन काळे,धनराज खाकरे,सचिन केंद्रे,ज्ञानेश्वर सरताळे, प्रविण गवई,अण्णा गवळी,दिलीप पवार,संदीप सुसर,रविंद्र सावळे,विनोद सपकाळ,चेतन ठाकरे,रविंद्र बागूल,मिर्झा,गोमलाडू आदींनी सहभाग नोंदविला होता.

महत्त्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!