Share

‘पवारांवर जनताच नाराज; त्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार नाही’

Published On: 

🕒 1 min read

चंद्रपूर : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात महत्वाचं विधान केलं होतं. ‘एकत्र आले तर भावी सहकारी’ असं विधान करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिलं. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. महत्वाचं म्हणजे यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील मंचावर होते.

गेल्या दोन दिवसांतील नेत्यांच्या विधानांमुळे राजकीय क्षेत्रात भूकंपाच्या हालचालींच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडीत सर्व आलबेल सुरु असताना अशा विधानांची काय गरज ? असं देखील पवार यांनी म्हटल्याच्या चर्चा आहेत. यावर आता भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘शरद पवार यांना उध्दव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज आहे,’ असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ‘शरद पवार, तुम्हाला तर जनतेने निवडणुकीत नापास केलं होतं. तुम्ही दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवरचं नाव खोडून स्वतःचं नाव टाकलं आणि सत्ता आली म्हणून सांगत आहात,’ असं म्हणत मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीसह पवार यांचा समाचार घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!