Share

बाप्पा चालले गावाला… श्रीमंत दगडूशेठ बाप्पाचे विसर्जन उद्या ‘या’ वेळी होणार

Published On: 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी उत्सवात सलग दुस-या वर्षी श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात होणार आहे. अनंत चतुर्दशीला रविवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी सूर्यास्ताच्यावेळी सायंकाळी ६ वाजून ३६ मिनीटांनी मंदिरामध्येच विसर्जन होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने मंदिरामध्येच व ऑनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सलग दुस-या वर्षी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दगडूशेठ गणपती ट्रस्टने व्हर्च्युअल माध्यमांद्वारे केलेल्या श्रीं च्या दर्शनसेवेचे पत्राद्वारे कौतुक केलं. दगडूशेठच्या श्रीं चे विसर्जन देखील मुख्य मंदिरातच होणार असून ऑनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभविता येणार आहे.

रविवारी सायंकाळी अभिषेक होणार आहे. त्यानंतर मंगल आरती होईल. फुलांनी सजविलेल्या पितळ्याच्या कुंडामध्ये श्रीं च्या मूर्तीचे विसर्जन होईल. ट्रस्टच्या मोजक्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत हे विसर्जन होणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… निर्विघ्न या… अशी प्रार्थना श्रीं ची चरणी यावेळी करण्यात येणार आहे.

अशोक गोडसे म्हणाले, समस्त पुणेकरांनी व गणेशभक्तांनी देखील घराबाहेर न पडता घरीच विसर्जन करावे. यामुळे कोरोनाशी सुरु असलेली लढाई लवकर संपविणे शक्य होईल. नागरिक घराबाहेर न पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास देखील मोठी मदत होणार आहे. श्रीं च्या विसर्जनासोबत कोरोनाचेही विसर्जन होण्यास हातभार लागेल.

  • ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार दगडूशेठ गणपती चा विसर्जन सोहळा

श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, ऍप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live,  या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण विसर्जन सोहळा ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या भाविकांना पाहता येणार आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!