Share

मोदींच्या ‘सुरक्षेतील त्रुटी’ला जबाबदार कोण? हायकोर्टात आज होणार सुनावणी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: पंजाबच्या दौऱ्यावर असताना फिरोजपूर येथे पंतप्रधान नरेंद मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षेतील त्रुटीवरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी कॉंग्रेस तसेच पंजाब सरकारवर चांगलीच टीका केली आहे. दरम्यान मोदींच्या सुरक्षेचा भंग झाल्याप्रकरणी, न्यायालयाच्या देखरेखीखालील चौकशीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण आणि न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हेमा कोहली यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठ लॉयर्स व्हॉईस या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर आज विचार करण्याची शक्यता आहे.

दरम्यान मोदींच्या सुरक्षेचे उल्लंघन ही राज्य सरकारची जाणीवपूर्वक केलेली चूक असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि पंजाब सरकारला पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करण्यापासून रोखले आहे. यासोबतच पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयास पंजाब सरकार, पोलीस व केंद्रीय यंत्रणांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याच्या तीन दिवस अगोदरची सुरक्षेशी संबंधीची व्यवस्था व नोंदी तत्काळ मिळवण्याचे निर्देश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!