Share

महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करणारा इम्तियाज जलील कोण?-चंद्रकांत खैरे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: वीर शिरोमणी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान व आदर्श आहेत. त्यांच्यामुळेच आज हिंदुस्थानात हिंदू जीवंत आहेत. महाराणा प्रताप यांचा अश्‍वारूढ पुतळा होणारच. पुतळ्याला कोणी विरोध केला तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी दिला. तसेच महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला विरोध करणारा इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) कोण? त्यांचा काय संबंध असा सवालही यावेळी उपस्थित केला.

महाराणा प्रताप यांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्याऐवजी सैनिकी शाळा सुरू करा अशी भुमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी मांडल्याने त्यांच्या विरोधात राजपूत समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्याबरोबरच ते म्हणाले, महापालिकेने ८७ लाखांचे बजेट तयार करून मान्यता घेतली आहे. नियमानुसार तिथे महाराणा प्रताप यांचा अश्‍वारूढ पुतळा बसवला जाणार आहे, आता केवळ निविदा काढणे बाकी आहे. त्या ठिकाणी पुतळा होणारच आहे.

महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरूष आहेत. आमचे प्रेरणास्थान आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमच्या धर्मावर आकस ठेवून बोलण्याचे काम खासदार करत आहेत. वातावरण खराब करण्याचे ते कम करतात. एमआयएम खासदाराचे राजकारण आता लोकांच्या ध्यानात आले आहे. महाराणा प्रताप यांचा अश्‍वारूढ पुतळा होणारच. विरोध करताना आपण कोणाला विरोध करतोय हे आधी खासदारांनी समजून घ्यावे त्यांनी इतिहास वाचाव असा टोला लगावत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी वेळप्रसंगी शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!