Share

पर्रीकरानंतर भाजपच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांनी केली अपक्ष लढण्याची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

गोवा : दोन दिवसांपूर्वीच गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर(Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर(Utpal Parrikar) यांनी बंडखोर वृत्ती स्वीकारत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. असे असतांनाच आता भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी देखील पक्षाला रामराम ठोकत अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर(Laxmikant Parsekar) यांनी पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली असून विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. यामुळे पार्सेकर भाजपवर नाराज होते. त्यामुळेच पार्सेकर यांनी आता भाजपला रामराम ठोकला असून पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही सोडल्याचे जाहीर केले आहे. तसेच या संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत पार्सेकर म्हणाले की,’आपल्या हृदयावर दगड ठेवून मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मला मंत्री नव्हे तर आमदार होण्याची अपेक्षा आहे. याचे कारण म्हणजे, मी माझ्या कार्यकाळात पेडणे तालुक्यात जनहिताचे प्रकल्प आणले, ते आजही अर्धवट अवस्थेत आहेत. हे प्रकल्प मला पूर्ण करायचे आहेत. आणि त्यासाठी मी सरकारमध्येच असले पाहिजे असे नाही. फक्त विधानसभेत या प्रकल्पांसाठी आवाज उठवायची गरज आहे. त्यासाठी मी लढणार आहे’, असे पार्सेकर म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’मांद्रे मतदारसंघातील युवकांमध्ये असलेली बेरोजगारीची समस्या मला दूर करायची आहे. त्यासाठी मी आता पुन्हा निवडणूक लढविणार आहे.’ तसेच खूप जड अंत:करणाने मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, असेही पार्सेकर यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!