🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात ५५ धावांची संस्मरणीय खेळी खेळली. १७ जूनला राजकोट येथे झालेल्या सामन्यात त्याने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६९ धावाच करता आल्या. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ८२ धावांनी पराभव केला. दिनेश कार्तिकने आतापर्यंत या टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. तर कर्णधाराची भूमिका साकारणारा ऋषभ पंत या मालिकेत संघर्ष करताना दिसत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. यावर बोलताना त्याने हेही सांगितले की टी-२० वर्ल्ड कपसाठी या दोन खेळाडूंमध्ये कोण चांगला आहे?
जेव्हा डेल स्टेनला ईएसपीएन क्रिकइन्फोवर विचारण्यात आले की, टी-२० विश्वचषकासाठी दिनेश कार्तिकने ऋषभ पंतपेक्षा जास्त प्रभावीपणे दावेदारी दाखवली आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात तो विचार न करता म्हणाला, हो नक्कीच. स्टेनच्या मते, ‘पंतला या मालिकेत चार संधी मिळाल्या असून तो सातत्याने चुका करत आहे. तुम्ही असेही म्हणू शकता की चांगले खेळाडू चुकांमधून शिकतात पण त्यांनी तसे केले नाही. तर दिनेश कार्तिकने तो कोणत्या स्तराचा खेळाडू आहे हे प्रत्येक वेळी दाखवून दिले आहे.’
स्टेन पुढे म्हणाला की, ‘मला वाटतं तुम्हाला टी-२० विश्वचषक जिंकायचा असेल तर तुम्ही अशा व्यक्तीची निवड करा जी तुमच्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडेल. या दृष्टीने पाहिलं तर, दिनेश कार्तिक सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याचा फॉर्म कायम राहिल्यास टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय खेळाडूंपैकी तो एक असेल.’ डेल स्टेनने शुक्रवारी दिनेश कार्तिकच्या २७ चेंडूत ५५ धावांच्या खेळीचे कौतुकही केले.
या मालिकेत पंतपेक्षा कार्तिक सरस ठरला आहे
दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली फलंदाजी केली आहे. त्याने ४ डावात १५८.६ च्या स्ट्राईक रेटने ९२ धावा केल्या आहेत. त्याच वेळी मधील षटकांमध्ये त्याने १८६.७ च्या स्ट्राइक रेटने ८४ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे ऋषभ पंत ४ डावात केवळ ५७ धावा करू शकला आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १०५.६ असा राहिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
