नागपूर : भाजपाचे विद्यमान आमदार व राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bavankule) आणि आमदार कृष्णा खोपडे यांनी चक्कं नागपूरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेतल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. चक्कं पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेतल्यामुळे आता यातून नवा वाद निर्माण झाला आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. हा प्रकार घडल्यामुळे आता विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनीही आपण पोलीस आयुक्तालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता नागपूर मध्ये नव्या वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार कृष्णा खोपडे हे दोघेही नागपूर पोलीस आयुक्तांना काही विषया संदर्भात निवेदन देण्याकरिता गेले होते. परंतु त्यांनी तिथे चक्क आयुक्तांच्या कार्यालयातच पत्रकार परिषद घेतली आणि विशेष बाब म्हणजे आमदारांच्या या कृतीला कोणीही विरोध केला नाही, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अजित सिंह यांनी आक्षेप घेतला आहे. अशाप्रकारे एका शासकीय कार्यालयात भाजपाने पत्रकार परिषदेत घेणे चूक आहे आणि त्यास विरोध न करणे हे देखील तेवढेच गंभीर आहे, असेही अजीत सिंह यांनी सांगितलं.
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. शेख हुसेन यांना अटक करुन सुटका करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसच्या इतर नेत्यांवर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विरोधात निवेदन देत शुक्रवारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती.
महत्वाच्य बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

