Share

मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात? भाजपचं ठरलंय….

Published On: 

गुवाहाटी : आसाम विधानसभा निवडणुकीच्या आठवडाभरानंतरही मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. दरम्यान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यपाल जगदीश मुखी यांच्याकडे राजीनामा दिला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार सोनोवाल सरकारमध्ये मंत्री असलेले हिमंत बिस्वा यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. गुवाहाटीमध्ये दुपारी भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

नवनिर्वाचीत आमदारांच्या या बैठकीला केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे महासचिव अरुण सिंह यांचीही उपस्थिती राहणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी शनिवारी झालेल्या बैठकीतच मुख्यमंत्री पदाच्या नावावर एकमत झाले असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह आणि ज्येष्ठ नेते बी.एल. संतोष यांची उपस्थिती होती.

आसाममध्ये तीन टप्प्यात झालेल्या मतदानानंतर भाजपसह मित्रपक्षांचे ७५ उमेदवार विजयी झाले आहे. स्पष्ट बहुमत मिळाल्याने आसाममध्ये भाजपचा सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहे. गेल्या ७० वर्षांच्या इतिहासात आसाममध्ये दुसऱ्यांदा एकाच पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची परंपरा नाही. काँग्रेस व्यतिरीक्त इतर कोणत्याच पक्षाला ही किमया करता आली नव्हती.

मुख्यमंत्री सोनोवाल देखील पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी काँग्रेसचे नेते राजिब लोचन पेगू यांचा ४३ हजार १९२ मताधिक्याने परभव केला आहे. तर हिमंत बिस्वा यांनी काँग्रेसच्या रोमेन चंद्र बोरठाकुर यांचा १.०१ लाख मतांनी परभव केला आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळी १२ आमदार असलेल्या बोडोलँड पीपुल्स फ्रंन्ट या वेळी काँग्रेस सोबत होते. त्यांच्यामुळेच गेल्यावेळी भाजपने सत्ता स्थापन केली होती.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!