Share

भाजपच्या आमदार आणि शिवसेनेच्या महिला नेत्यांची कोविड सेंटरवर धक्काबुक्की

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

अशी सर्व भीषण परिस्थिती असताना महाराष्ट्रातील राजकारण काही थांबण्याचे चित्र पाहायला मिळत नाही आहे. आज सकाळी मुंबईतील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी भाजपच्या आमदार भारती लव्हेकर, नगरसेवक योगीराज दाभाडेकर ,रंजना पाटील आणि शिवसेना नगरसेविका राजूल पटेल उपस्थित होते. सकाळी 11.30 च्या सुमारास लस देण्यावरून पटेल आणि लव्हेकर यांच्यात वाद झाला. शाब्दिक चकमकीनंतर दोघींमध्ये बाचाबाची झाली आणि धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे भारती लव्हेकर यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

कोरोना लसीकरण सुरू असताना लस देण्यावरून दोन्ही पक्षाच्या महिला नेत्या आमनेसामने आल्या. यावेळी दोन्ही महिला नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि दोघींमध्ये धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाले होते.

 

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!