🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेतील पेंग्विन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचे अंड देणारी कोंबडी असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसने केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची संकल्पना असलेल्या पेंग्विनवर होणाऱ्या खर्चावर काँग्रेसने निशाणा साधला आहे. नुकतेच महापालिकेने पेंग्विनच्या देखभालीसाठी १५ कोटींची निवीदा काढली आहे. या खर्चावर काँग्रेसने सवाल उपस्थित केला आहे. यावरुन आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे. त्यावरुन आता निलेश राणेंनी ट्वीट करत काँग्रेस टीका तर ठाकरे कुटुंबाची टिंगल उडवली आहे.
महापौर मॅडमना नक्की कोणाला इज्जत द्यायची होती आणि कोणाची काढायची होती कळलं नाही. एकापेक्षा एक लोकं भरलेत शिवसेनेत. कारण काही असो पण ठाकरे परिवाराची कुठे ना कुठेतरी टिंगल उडेल असेच वक्तव्य रोज चालू असतात शिवसेनेतून. विरोधकांना काही करायची गरजचं नाही, असं म्हणत ठाकरे कुटुंबाची टिंगल उडवली आहे.
महापौर मॅडमना नक्की कोणाला इज्जत द्यायची होती आणि कोणाची काढायची होती कळलं नाही. एकापेक्षा एक लोकं भरलेत शिवसेनेत, कारण काही असो पण ठाकरे परिवाराची कुठे ना कुठेतरी टिंगल उडेल असेच वक्तव्य रोज चालू असतात शिवसेनेतून… विरोधकांना काही करायची गरजचं नाही. https://t.co/fwAsiGJVj0
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 5, 2021
पेंग्विनची सुश्रुषा करण्यासाठी खर्च होतोय, पण पर्यटकांमुळे रेव्हेन्यू वाढतो आहे. पेंग्विनवरुन जे लोक राजकारण करु पाहत होते ते आत जाऊन पेंग्विन पाहून मजा घेत आहेत, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेला लगावला होता. पेडणेकारांच्या याच वक्तव्यावरुन राणेंनी टिंगल उडवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पेंग्विनवरुन राजकारण करणारे पेंग्विन पाहून मजा घेतात; महापौरांचा टीकाकारांना टोला
- किसान महापंचायतीला भाजप नेते वरूण गांधी यांनी दिला पाठिंबा, म्हणाले…
- ‘इन्फोसिसचे देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान’; ‘त्या’ वादग्रस्त स्टोरीनंतर संघाचे स्पष्टीकरण
- शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार ; किसान महापंचायतीला मुजफ्फरनगरमध्ये झाली सुरुवात
- ‘सत्तेसाठी लाचार शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसली’, आ. सावे यांचे दानवेंना प्रत्युत्तर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
