🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेतील पेंग्विन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचे अंड देणारी कोंबडी असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसने केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची संकल्पना असलेल्या पेंग्विनवर होणाऱ्या खर्चावर काँग्रेसने निशाणा साधला आहे. राणीच्या बागेतील पेंग्विन पुन्हा एकादा वादाचा आणि चर्चेचा मुद्दा ठरत आहे. नुकतेच महापालिकेने पेंग्विनच्या देखभालीसाठी १५ कोटींची निवीदा काढली आहे. या खर्चावर काँग्रेसने सवाल उपस्थित केला आहे. यावरुन आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे.
पेंग्विनची सुश्रुषा करण्यासाठी खर्च होतोय, पण पर्यटकांमुळे रेव्हेन्यू वाढतो आहे. पेंग्विनवरुन जे लोक राजकारण करु पाहत होते ते आत जाऊन पेंग्विन पाहून मजा घेत आहेत, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेला लगावला आहे. राणी बागेची ओळख म्हणून पेंग्विन ओळखला जात आहे. एवढा मोठा खर्च होतोय. पण या पक्षाला वेगळं वातावरण लागतं, तेच वातावरण आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे त्यात कोणतीही तडजोड होणार नाही, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं म्हणाल्या आहेत.
यापूर्वी गेल्या ३ वर्षांसाठी पेंग्विनच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला ११ कोटी देण्यात आले आहेत. पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेचेच डॉक्टर नेमले जाणं शक्य असतांनाही बाहेरुन टेंडर काढून कंत्राटदार नेमण्याची गरज काय? असा सवाल मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक; पोलीस बंदोबस्त झुगारत कार्यकर्त्यांच्या पाण्यात उड्या
- किसान महापंचायतीला भाजप नेते वरूण गांधी यांनी दिला पाठिंबा, म्हणाले…
- ‘इन्फोसिसचे देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान’; ‘त्या’ वादग्रस्त स्टोरीनंतर संघाचे स्पष्टीकरण
- शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार ; किसान महापंचायतीला मुजफ्फरनगरमध्ये झाली सुरुवात
- ‘सत्तेसाठी लाचार शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसली’, आ. सावे यांचे दानवेंना प्रत्युत्तर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
