Share

२००९ साली ‘ध’ चा ‘प’ कोणी केला? धनंजय मुंडेंच्या भाषणानंतर चर्चांना उधाण

Published On: 

बीड : पेशवाई काळातील आनंदीबाईंच्या ‘ध’ च्या ‘मा’ ने इतिहासाला कलाटणी मिळाली होती. अगदी तशीच कलाटणी बीडच्या राजकारणालाही मिळाली. मात्र, त्याला आता १२ वर्ष होत आहेत. तब्बल एका तपानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी २००९ च्या निवडणुकीत ‘ध’ चा ‘प’ झाल्याची खंत व्यक्त केली. काही राजकीय सल आयुष्यभर बोचत राहतात हेच धनंजय मुंडेंच्या भावनिक भाषणातून पुन्हा समोर आले.

धनंजय मुंडे हे राज्यातले एक फायरब्रँड नेतृत्व. ते भाषणाला उभे राहिले तर लाह्या फुटाव्यात तसे शब्द फुटतात. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांच्या तालमीत तयार झालेली धनंजय मुंडेंची वकृत्त्वशैली अनेकदा भावूकही होते आणि मग धनंजय मुंडे मनमोकळेपणाने बोलतात. शनिवारी स्वतःच्या जन्मगावात धनंजय मुंडे असेच भावूक झाले आणि त्यांनी तब्बल १२ वर्षापुर्वीचा सल बोलून दाखविला.

ते म्हणाले, ‘आपण जिल्हा परिषदेचे सदस्य झालो, पण अध्यक्षपदाने कायम हुलकावणी दिली. त्यावेळी २००९ मध्ये आपल्यालाच विधानसभेची उमेदवारी मिळणार होती. पण रात्रीतून ‘ध’ चा ‘प’ झाला. तो कोणी केला? संघर्ष मला नवा नाही. आताही मी मंत्री झाल्यावर माझ्यावर आरोप केले गेले’ याची खंत धनंजय मुंडेंनी बोलून दाखविली. पेशवाई काळातील ‘ध’ च्या ‘ मा’ नंतर मुंडेशाहीतील ‘ध’ चा ‘प’ ची चर्चा सुरू झाली आहे. आता हे सारे करणारे कोण याचीच चर्चा जिल्ह्यात होत आहे. याबाबत बीड येथील ‘प्रजापत्र’ दैनिकाने बातमी प्रकाशित केली आहे.

२००९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, ऐनवेळी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराज होऊन धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर बहिण-भावाच्या लढाईत पंकजा यांनी बाजी मारली. मात्र, राष्ट्रवादीने धनंजय यांना विधानपरिषदेवर संधी दिली. अनेक घडामोडी घडल्यानंतर ते आता राष्ट्रवादीकडून कॅबिनेट मंत्री आहेत. परंतू, आजही त्यांना जुन्या गोष्टीबद्दल वाईट वाटत असल्याचे त्यांच्या भाषणावरून जाणवते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!