Share

मुंबईतील भुखंडाचं श्रीखंड कुणी खाल्लं? भाजपचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील काही दिवसांपासून एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळत आहे. आता याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट अंडरवर्ल्डशी नवाब मलिक यांचे संबंध असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी कागदोपत्री पुरावे देखील सादर केले आहेत.

नवाब मलिक यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शहावली खान या गुन्हेगारासोबत जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. मुंबईच्या एलबीएस रोडवरील २.८ एकर जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडे होती. त्यांच्याकडून ही साडेतीन कोटींची जागा नवाब मलिक तेव्हा सक्रिय असलेली कंपनी सॉलिडस कंपनीने खरेदी केली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आता यावरच भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आता ठाकरे सरकारवर निशाना साधत सवाल केला आहे.

ही तर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या काळ्या कारकिर्दीची कबुली आहे. शाह वली खान या वॉचमनने सातबारावर नाव टाकून हडप केलेली जमीन विकत घेतल्याची कबुली देऊन नवाब मलिक यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातील एका गंभीर जमीन गैरव्यवहारावर प्रकाश टाकला आहे. या जमीन बळकाव प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली आहे. तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात मुंबईतील अशा किती भूखंडांवर डल्ला मारून बेकायदा आर्थिक व्यवहारांद्वारे जमीनी घशात घालण्यात आला, मुंबई लुटण्यात आली त्याची चौकशी करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री ठाकरे देतील का? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

हा सर्व प्रकार म्हणजे सगळंच गौडबंगाल आहे. एक वॉचमन सातबारावर आपले नाव घुसवून जमीन हडप करतो, आणि एक मंत्री जुजबी पैसे देऊन ती स्वत:च्या ताब्यात घेतो काय चाललंय काय? हा तर भूखंडाच्या श्रीखंडाचाच आणखी एक प्रकार आहे. मुंबईतील भुखंडाचं श्रीखंड कुणी खाल्लं हे जुन्या लोकांना माहिती आहे. ‘साहेबां’चा चेला शोभतात. असे खोचक ट्वीट केशव उपाध्ये यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!