🕒 1 min read
मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. त्याचबरोबर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोन सलामीवीर आहेतच, पण आता ऋतुराज गायकवाड आणि आयपीएलमध्ये जोरदार फटकेबाजी करणाऱ्या वेंकटेश अय्यरलाही संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक आणि सलामीवीर असलेल्या इशान किशनलाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आता संघात पाच सलामीवीर असणार आहेत.
मात्र यावेळी संघात विश्वचषकातील दिग्गज खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. यामध्ये कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर यांना संधी दिलेली नाही. तर यंदा युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली दिसते. तर आयपीएल गाजवणारा आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला यावेळी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर हे संघात आहेत. विश्वचषकासाठी ज्याची निवड केली नसल्यामुळे वाद झाला होता तो फिरकीपटू युजवेंद्र चहल भारतीय संघात परतला आहे.
दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांनी युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यातच आता संघात युवा खेळाडूंचा अधिक भरणा दिसून येत आहे. दरम्यान पुढच्या विश्वचषकासाठी संघ बांधणी करण्यासाठी निवड समितीने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान न्यूझीलंड संघ टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी २० सामने असतील. तर कसोटी सामने कानपूर आणि मुंबई होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- झीलंडविरुद्ध टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मा भूषविणार कर्णधारपद
- T20 WC: आज रंगणार उपांत्य फेरी; इंग्लंडपुढे न्यूझीलंडचे आव्हान
- ये तो हसीना का नवाब निकला….; फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपची टीका
- अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग; फडणवीसांनी दिले पुरावे

