Share

शरद पवारांना शुभेच्छा देताना ‘त्या’ आठवणीने रांगड्या मुश्रीफांना अश्रू अनावर!

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, देशाचं संरक्षणमंत्री पद, कृषीमंत्रीपद अशी अनेक महत्त्वाची पदं सांभाळली आहे. सध्या शरद पवार हे राज्यसभा खासदार आहेत. महाराष्ट्रात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामध्ये त्यांनी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार म्हणजेच शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची यांची मूठ बांधण्यात आली. आज शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. 80 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी देखील पवारांना शुभेच्छा दिल्या.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील पवारांना शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देतानाच रांगड्या मुश्रीफांना गहिवरून आलं. हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांना व्हर्च्युअल पद्धतीने आज शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबतच्या अनेक आठवणी जागवल्या. मिरज दंगलीनंतर मुश्रीफ निवडून आले होते. त्यानंतर पवारांनी केलेल्या कौतुकाचा उल्लेख करताना त्यांना अश्रू रोखणे अवघड झाले.

2009 च्या विधानसभा निवडणुकीआधी सांगली जिल्ह्यातील मिरज येथे गणेशोत्सवादरम्यान जातीय दंगल झाली. त्याचा परिणाम म्हणून त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही मुश्रीफ कागलमधून विक्रमी मतांनी निवडून आले होते. या निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माझा कार्यकर्ता निवडून आला याचा मनस्वी आनंद असल्याचा उल्लेख केला होता. हेच सांगताना मुश्रीफ मंचावरून बोलतानाच थबकले व त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते आज कोल्हापूरातूनच व्हिडीओ मिटिंगद्वारे पवारांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!