Share

लाच घेताना जिल्हा प्रशासनाचा ‘बडा’ मासा एसीबीच्या गळाला

Published On: 

बीड : अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी लाचखोरी करणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. वाहन चालकामार्फत ६५ हजार रुपयांची लाच घेताना येथील उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकालगत काल रात्री ९ वाजता जालना येथील पथकाने केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनूसार, अवैध वाळूची गाडी सुरू करण्यासाठी तक्रारदारास उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड याने चालक लक्ष्मण काळे याच्या मार्फत लाचेची मागणी केली होती. शिवाय वाळू वाहतूक सुरु होताच गाडी पकडून ती तहसील कार्यालयात लावून सोडण्यासाठी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत मागणी केली. त्यामुळे वाहतूकदाराने थेट जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानुसार जालना येथील एसीबीचे उपअधीक्षक रवींद्र निकाळजे व सहकाऱ्यांनी गुरुवारी रात्री ९ वाजता उपविभागीय कार्यालयाजवळील छत्रपती संभाजी महाराज चौकात सापळा लावला. ठरल्याप्रमाणे चालक लक्ष्मण काळे लाच स्वीकारण्यास एका हॉटेलमध्ये आला. ६५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला झडप घालून पकडले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाडला कार्यालयातून ताब्यात घेतले. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!