नागपूर: प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सुरुवातीला इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे या कार खरेदि केल्या जात नव्हत्या मात्र आता , कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. तर सरकार देखील इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देखील देत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात प्रवास करताना आपल्या बुलेटप्रूफ गाडी रामराम केलाय. नागपूर शहराला स्वच्छ, हरित, सुंदर ठेवण्यासाठी इंधनाच्या कार वापरणार नाही, असं म्हणत नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक कार वापरायला सुरुवात केलीय. गडकरी जेव्हा नागपुरात असतील तेव्हा तेव्हा ते पांरपारिक इंधनावर चालणाऱ्या कारऐवजी इलेक्ट्रिक कार वापरतात. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी इंधन वाहनांचं प्रमाण कमी करणे गरजेचं आहे. याला पर्याय म्हणुन इलेक्ट्रिक वाहनांकडे बघितलं जातंय. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गडकरींनी स्वत: इलेक्ट्रिक कार वापरायला सुरुवात केली आहे.
नुकताच नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. स्क्रॅपिंग पॉलिसीअंतर्गत ऑटोमोबाईल कंपन्यांकडून नवीन कार खरेदी करण्यावर घसघशीत सूट दिली जात आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. गडकरी यांनी सांगितलं की, केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ मध्ये केंद्र सरकारने एक स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर केली होती, ती लवकरच देशात लागू केली जाणार आहे.
‘स्क्रॅपिंग पॉलिसीमध्ये चार टप्पे असतील. एका टप्प्यात, जर आपण आपले जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी केले तर आपल्याला पाच टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. मात्र या वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे. स्क्रॅपिंग पॉलिसी लागू झाल्यानंतर २० वर्षांचे खासगी वाहन आणि १५ वर्ष जुन्या व्यावसायिक वाहनासाठी फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे. याकरता ऑटोमेटेड फिटनेस सेंटर पीपीपी मोडमध्ये सुरु केले जातील’. अस गडकरी म्हणाले आहेत. तर, ज्यामुळे देशात रोजगारनिर्मिती देखील होणार आहे, असं देखील गडकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘तारेवरची कसरत लीलया पूर्ण करत अर्थमंत्री अजित पवारांनी दुसरा अर्थसंकल्प मांडला’
- पैठण-औरंगाबाद रस्त्यावर दुचाकीचा अपघात, महिला दिनीच महिलेचा बळी
- ‘अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणे हे तसे जिकिरीचेच काम होते’
- ‘हा अर्थसंकल्प घेणारा नव्हे तर देणारा अर्थसंकल्प’
- ‘अर्थसंकल्पावर टीका करणे हे विरोधकांचे पारंपरिक काम’


