उस्मानाबाद : सोशल मीडियावर लाईव्ह प्रक्षेपण करून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना धमकी देणारा हा मुंबई बाबा कोण आहे? त्याला आजच्या आज अटक करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. आमदाराला धमकी देणारे गुंड राज्यात असतील तर या विधानसभेला काही अर्थ उरणार नाही, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.
पनवेल येथील नंदू पाटील नावाच्या व्यक्तिने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर थेट प्रक्षेपण करून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. या धमकीचे पडसाद सोमवारी विधानसभा अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राऊत यांना ठार मारण्याच्या देणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचे केसालाही धक्का लावला तर जीवंत सोडणार नाही, अशी धमकी आमदाराला मिळत असेल तर नक्कीच हा चिंता करायला लावणारा आणि असुरक्षितता निर्माण करणारा प्रकार असल्याचे फडणवीस म्हणाले. याप्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला आजच्या आज अटक करावी आणि सभापतींनी आमदारांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- मराठवाडा वॉटरग्रीड बंदकरण्याचे पाप करणार नाही : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील
- मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाबाबत विधान परिषदेत आमदार आक्रमक, एकत्रीत बैठक घेण्याची सभापतींची सूचना
- लग्नसोहळा आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला; भीषण अपघातात एक ठार, सहा जखमी
- वडापाव खाऊ घालण्याचे आमिष दाखवून सात वर्षीय बालिकेवर अत्याचार; २० वर्षे सक्तमजुरी
- औरंगाबादेत कोरोनाचे ३८८ रुग्ण, पाच जणांचा मृत्यू; ५५० जणांना दिला डिस्चार्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

