Share

देवदत्त पड्डिकलचा धडाका सुरुच; सलग चौथ्या सामन्यात शतक

Published On: 

दिल्ली : आयपीएल मधील रॉयल चॅलेजर बंगळुरु संघाचा सलामीचा फंलदाज देवदत्त पड्डिकल ने विजय हजारे ट्राफीत आपला धडाका सुरुच ठेवला आहे. सोमवारी दिल्ली येथे झालेल्या उपांत्य पुर्व सामन्यात पड्डिकलने केरळ विरुद्ध पुन्हा धडाकेबाज खेळी करत १०१ धावा फटकावत शतक साजरे केले आहे.

या शतकासह देवदत्त पड्डिकलने लिस्ट एमध्ये सलग चार सामन्यांत शतकवीर होण्याचा पराक्रम केला आहे. लिस्ट एमधील चार सामन्यांत सलग शतकवीराचा बहुमान मिळवणारा पड्डिकल हा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. पड्डिकलच्या या धडाकेबाज खेळीच्या आधारे कर्नाटक संघाने विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. कर्नाटकच्या पड्डिकलने गत तीन सामन्यांत १४५*, १२६* अाणि १५२ धावांची खेळी केली होती.

सोमवारी विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकच्या युवा फलंदाज देवदत्त पड्डिकलच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर गत चॅम्पियन कर्नाटक संघाने उपांत्यपूर्व फेरीत केरळचा पराभव केला. कर्नाटकने ८० धावांनी सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने ३ गड्यांच्या मोबदल्यात ३३८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात केरळचा संपुर्ण संघ हा ४३.४ षटकांत अवघ्या २५८ धावांत माघारी परतला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!