मुंबई: कोरोना काळ आणि कपूर कुटुंबीय यांच्यामागील संकट गेल्या वर्दी पासून सुरूच आहेत. त्यानंतर आता कपूर कुटुंबाच्या चिंतेत आता पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आजारी आहे. आई नीतू कपूरनंतर आता रणबीरलाही कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता सध्या क्वारंटाईन असून आराम करत आहे.
पिंकविलानं दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर सध्या क्वारंटाईनमध्ये असून आराम करत आहे. कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी लस उपलब्ध झाली आहे, मात्र कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.
याबद्दल काका रणधीर कपूर यांना विचारलं गेलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, की रणबीरची तब्येत ठीक नाही. मात्र, त्याला कोरोना झाला आहे, की नाही हे माहिती नाही. ते पुढे म्हणाले, की मी सध्या शहराच्या बाहेर आहे. यानंतर आता चाहत्यांनी आलिया भट्ट आणि अयान मुखर्जीसाठीही काळजी व्यक्त केली आहे. कारण नुकतंच आलिया आणि अयान दोघंही ब्रह्मास्त्रच्या सेटवर रणबीरसोबत होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘तारेवरची कसरत लीलया पूर्ण करत अर्थमंत्री अजित पवारांनी दुसरा अर्थसंकल्प मांडला’
- पैठण-औरंगाबाद रस्त्यावर दुचाकीचा अपघात, महिला दिनीच महिलेचा बळी
- ‘अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणे हे तसे जिकिरीचेच काम होते’
- ‘हा अर्थसंकल्प घेणारा नव्हे तर देणारा अर्थसंकल्प’
- ‘अर्थसंकल्पावर टीका करणे हे विरोधकांचे पारंपरिक काम’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

